कॉर्पोरेट्ससाठी
....जेव्हा आपण आपल्या व्यवसायात नवीन उत्पादन/नवीन सेवा सादर करत आहात किंवा व्यवसायाची पुनर्रचना करत आहात,अशा प्रसंगी आम्ही आपल्या कर्मचाऱ्यांचे प्रयत्न नवीन दिशेने वळवून त्यांना १००% योगदान देण्यास प्रोत्साहित करू शकतो.
…. जेव्हा आपण कर्मचारी गळतीचे प्रमाण नियंत्रित करू शकत नाही,आपले प्रतिस्पर्धी आपल्या वचनबद्ध कर्मचाऱ्यांना नोकरीसाठी उचलतात,तेव्हा आम्ही कर्मचाऱ्यांचा धारणा कालावधी वाढविण्याच्या आणि बाहेरील प्रतिभा आपल्या कंपनीकडे आकर्षित करण्याच्या उपाययोजना सूचवतो.
शासन व नॉन प्रॉफिट क्षेत्राकरिता
....जेव्हा एक नेता म्हणून कामाच्या ठिकाणी आपल्यावर काही कालबद्ध उद्दिष्टे सोपविण्यात येतात आणि आपल्याला असे लक्षात येते की आपली टीम, ही कामे करण्यास पाहिजे तेवढी परिपक्व नाही. तेव्हा आम्ही आपल्या टीमला त्यांच्या क्षमतांची आणि कामातील संधीचा लाभ कसा घ्यायचा याची जाणीव करून देतो.
…जेव्हा आपल्या नॉनप्रॉफिट संस्थेला प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी निधी देणाऱ्या संस्थांकडून चांगला निधी मिळतो आहे. तथापि हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी लागणाऱ्या टीमच्या क्षमतांबाबत आपण असुरक्षित आहात,तेव्हा आम्ही त्यांना योग्य प्रशिक्षण देतो. एचआर धोरणे आणि कर्मचारी पुस्तिका तयार करून देतो. परिणामी ते अधिक प्रोफेशनल बनतात.