top of page
नमुरा एच. आर. वे
‘नमुरा एच आर वे’ हा आमचा ब्लॉग आहे ज्याद्वारे आम्ही आपल्या सर्वांना नियमितपणे भेटत राहू.…. एचआर व्यवस्थापनातील आमचे विविध विषयांवरील अनुभव, कायद्यातील बदल,लहानसहन टिप्स ,ट्रेंडस इत्यादी आम्ही आपल्याबरोबर नियमितपणे शेअर करू.जसे की आपल्या कर्मचार्यांना सांभाळण्यामध्ये सर्वसाधारणपणे कोणत्या जोखीमा आहेत आणि त्या कशा कमी करता येतील,एच आर मधील कायद्यांचे अनुपालन कसे करावे,नवीन कर्मचार्यांना कामावर घेताना मुलाखतीदारम्यान कोणत्या गोष्टी बारकाईने पाहणे महत्त्वाचे आहे ,आपल्या व्यवसायात आणखी वाढ होण्यासाठी मनुष्यबळ संरचनेत आणखी काय बदल करण्याची आवश्यकता आहे,आपल्या कर्मचार्यांना कामामध्ये प्रेरित करण्यासाठी कामाच्या ठिकाणी सुविधा,कामाच्या प्रक्रिया,पद्धती यामध्ये काय बदल करता येतील,कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण गरजा कशा शोधून काढता येतील,त्यानुसार कोणती ट्रेनिंग्स देता येतील,कर्मचाऱ्यांची कंपनीसोबतची बांधिलकी वाढविण्यासाठी त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन कसे करावे. अशा अनेक प्रकारच्या विषयांवर आपल्याला ' नमुरा एच आर वे' या ब्लॉगद्वारे माहिती देणार आहोत.आमच्या ब्लॉगचे हे वैशिष्ट्य राहील की एच आर व्यवस्थापनातील जे मुद्दे प्रॅक्टिकली काम करतेवेळीस उद्भवतात,असे मुद्दे आम्ही ब्लॉगच्या माध्यमातून हाताळू.आमचा असा मानस आहे की ‘नमुरा एचआर वे’ ब्लॉगद्वारे आम्ही आपल्याला निर्णय घ्यायला बरेच पर्याय निर्माण करू ज्यामुळे आपण कार्यकुशलतेने व्यवस्थापन करू शकाल.
bottom of page