
सर्वेक्षणातून कर्मचाऱ्यांना कामाबाबत काय वाटते,हे जाणून त्यांना प्रोत्साहन
आपल्याला सर्वांना माहीतच असेल की ‘कार्यक्षम कर्मचारी’हे केवळ समाधानी नसतात, परंतु त्यांना काम करण्याची प्रचंड आवड असते.
त्यांच्यातील कामाच्या आवडीचे मूल्यमापन करून त्यांची कामातील प्रेरणा कशी वाढवायची?
• ऑनलाइन सर्वेक्षणांच्या माध्यमातून आपल्या कर्मचार्यांच्या कामाबद्दलच्या प्रेरेणेचे मूल्यांकन करता येईल.सर्वेक्षणातून संकलित केलेल्या माहितीचे विश्लेषण करून आपल्याला कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेची सध्याची स्थिती सांगता येईल
• त्यांना काम मनोरंजक वाटते का कंटाळवाणे वाटते,आपल्या कामाद्वारे कंपनीचे सर्वांगीण उद्दिष्ट पूर्ण करण्यास आपण योगदान करतो आहोत,असे समाधान त्यांना त्यांच्या कामातून मिळते का?
• त्यांचे वरिष्ठ टीममधील सदस्यांना त्यांची स्वतःची उद्दिष्टे साध्य करताना अडचण आल्यास, योग्य ते मार्गदर्शन व वेळ देतात का?
• त्यांचे वरिष्ठ त्यांच्यावर आव्हानात्मक कामांच्या जबाबदऱ्या सोपवतात का?
• त्यांचे वरिष्ठ त्यांच्या लहान-सहान कामगिरीबद्दल त्यांचे लगेच प्रशंसा करून प्रोत्साहन देतात का किंवा सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करतात का?
• त्यांचे वरिष्ठ त्यांच्या टीममध्ये एकजूट निर्माण करणारं,खेळीमेळीचं वातावरण निर्माण करतात का?
कर्मचार्यांच्या प्रगतीचे मनापासून कौतुक करणे,त्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षिस देणे, ‘त्यांच्या योगदानाबद्दल वरिष्ठांनी व्यक्त केलेले सकारात्मक अभिप्राय’ त्यांचेपर्यंत पोहचवणे,अशी ‘कर्मचाऱ्यांची कामातील प्रेरणा वाढविण्याच्या धोरणांची आखणी’करण्यात मदत करता येईल.
एकूणच कर्मचाऱ्यांची कामातील प्रेरणा वाढविण्याची जबाबदारी,ही आपलीच असल्याची जाणीव,वरिष्ठ व्यवस्थापनाला करून देता येईल.