‘कंपनीचा पुढील पाच वर्षांचा दृष्टिक्षेप,कृती आराखडा आणि कंपनीची मूल्ये’ यावर प्रशिक्षण
आपल्याला जेव्हा लक्षात येते की कार्यालयातील वातावरण जरा विचलित झाले आहे, जुने कर्मचारी नवीन कर्मचार्यांवर दादागिरी करीत आहेत, ते त्यांना ज्ञान,कौशल्य शेयर करण्यास तळतळ करत आहेत.एकूणच कार्यालयात कर्मचार्यांना कामात फारसा रस वाटत नाहीये आणि कामात जरा दुर्लक्ष करून वायफळ गप्पा मारणे, टीका करणे आणि गौण विषयांवर राजकारण करण्यात वेळ घालवला जातोय .
• अशा वेळी नमुरा टीम कर्मचाऱ्यांना,कंपनीने आत्तापर्यंत केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीबाबत, कंपनीची मूल्ये व ध्येय-धोरणांबाबत सविस्तर माहिती देईल .
• पुढील पाच वर्षांसाठी कंपनीचा दृष्टीक्षेप,कंपनीची वार्षिक उद्दीष्टे याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करेल.
• टीमच्या सदस्यांना त्यांच्या क्षमतांनुसार आव्हानात्मक कार्ये देऊन, त्यांची क्षमता ओळखण्याची संधी दे ईल.
• कंपनीतील मॅनेजर्सना कृती आराखडयाप्रमाणे उद्दीष्टे साध्य करण्यासाठी मदत करेल.
• कर्मचार्यांना एकजुटीने वागण्यास,सकारात्मक दृष्टिकोण बाळगण्यास आणि परिस्थितीनुसार बदल मान्य करून त्याप्रमाणे वर्तणूकीत बदल करण्यास, मदत करेल.
याचे सर्वं परिणाम म्हणजे कार्यालयात निकोप स्पर्धेचे आणि सहयोगाचे वातावरण निर्माण होईल.