top of page

स्वॉट, टीएनए आणि प्रशिक्षणाव्यतिरिक्त गरजा


जेव्हा आपल्या कामाची उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपली टीम अधिक समंजस आणि परिपक्व हवी असेल आणि  आपल्याला त्याबद्दल असुरक्षिता वाटत असेल किंवा आपल्या प्रभावी नेतृत्वाचा ठसा आपल्याला आपल्या कर्मचाऱ्यांवर उमटवायचा असेल

 

 

 

 

 

 

 

•    कंपनीतील प्रत्येक कर्मचाऱ्याचे स्वॉट विश्लेषण(strength - सामर्थ्य, weakness -दुर्बलता, opportunity - संधी, threat -धमकी -यांचे  विश्लेषण )व प्रत्येक   कर्मचाऱ्याच्या प्रशिक्षण गरजा शोधुन (training need analysis - टीएनए) काढल्या जातील. 
•    ‘स्वॉट व टी एन ए’ विश्लेषणावरून 'तांत्रिक कौशल्ये आणि सॉफ्ट स्किल्स ‘यासाठी आवश्यक विषय ठरविले जातील.
•    कर्मचाऱ्यांच्या सॉफ्ट स्किल्सच्या  गरजांवर आधारित विषयांची निवड केली जाईल व त्यानुसार प्रशिक्षणाची रचना करून प्रशिक्षण दिले जाईल 
•    आपल्या कार्यालयातील ‘ टॉप -5 ’नॉन-ट्रेनिंग गरजा उदा. स्त्रोतांचा अभाव, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची संधी, व्यवसायाची प्रक्रिया सुलभ करणे इ. निवडण्यात येतील 
•    या  गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक रणनीतीचे  नियोजन करण्याकरीता नमुरा टीम मदत करेल.
कंपनीतील चांगल्या पायाभूत सुविधा, आव्हानात्मक कामे करण्याच्या संधी,शिकण्याचे वातावरण, सुव्यवस्थित प्रक्रिया या सर्व अनुकूल घटकांमुळे आपले कर्मचारी त्यांचे पूर्णपणे योगदान देऊन उद्दीष्टे पूर्ण करण्यास साहजिकच प्रेरित होतील.

प्रभावी लीडर.jpg
bottom of page