
नवीन जॉइनर्सना कामाच्या ठिकाणी सुरवातीला स्थानापन्न होण्यासाठी सहाय्य.
आपल्याला माहितच आहे की नवीन जॉइनर्सना सुरवातीच्या काळात टीममध्ये स्थानापन्न होण्यासाठी टीमच्या सदस्यांना प्रथम त्यांची चांगली ओळख करून देणे व त्यानंतर त्यांना आवश्यक सहाय्य करणे,महत्त्वाचे असते. कोणत्याही कंपनीसाठी हा एक महत्त्वाचा कालावधी असतो,जेव्हा नवीन जॉईनरला टीम व कंपनीला त्यांच्याबद्दल काय वाटते व त्यांच्याकडून टीमच्या व कंपनीच्या काय अपेक्षा आहेत, हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सांगितले जाते.
• नमुरा टीम नवीन जॉइनर्सना कंपनीची कार्य संस्कृती, कार्यप्रक्रीया व कार्य पद्धतींची ओळख करून त्यानुसार आवश्यक ती पावले टाकायला नवीन जॉईनरला सहाय्य देते.
• नमुरा टीम ,कंपनीतील टीमच्या इतर सदस्यांना आणि मॅनेजर्सना नवीन जॉइनरला टीममध्ये सामावून घेताना संयम ठेवण्यास सांगते.नवीन जॉइनरला कामाची पूर्ण माहिती होईपर्यन्त पुरेसा वेळ व वाव दिला तर नवीन जॉईनर खुल्या पद्धतीने नवीन ज्ञानाचे ग्रहण करेल व नवीन कौशल्य शिकेल,ह्याची टीम-मॅनेजर व इतर सदस्यांना जाणीव करून देते.
• नमुरा टीम,कंपनीतील टीममधील सदस्यांना आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये यांचे मार्गदर्शन करून नवीन जॉईनरशी अर्थपूर्ण संवाद साधण्यास मदत करते.